स्कॉलरशिप योजना💐💐 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना समाजातील गरीब विद्यार्थ्यांना कमीत कमी पैशात स्पर्धा परीक्षेचे क्लासेस मिळावे म्हणून फिनिक्स अकॅडमी तर्फे ही स्कॉलरशिप योजना चालू करण्यात येत आहे. 1. या योजनेतील प्रवेश हे ऑफलाइन एक परीक्षा घेऊन निश्चित करण्यात येईल. 2. या परीक्षेसाठी पाचवी ते बारावी पर्यंतच्या इतिहास भूगोल, विज्ञान,पर्यावरण, अर्थशास्त्र, राज्यघटना, चालू घडामोडी ,गणित व बुद्धिमत्ता ( स्कॉलरशिपच्या किंवा स्पर्धा परीक्षेला जी गणित व बुद्धिमत्ता आहे त्यावर आधारित प्रश्न) अभ्यासक्रमावर आधारित पेपर घेण्यात येईल. 3. या सर्व ॲडमिशन ऑफलाईन बॅचेस साठी राहतील. 4. विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्याला राहण्याचा व जेवणाचा खर्च स्वतः करावा लागेल. 5. अभ्यासक्रम कालावधी एक वर्षाचा राहील. 6. यामध्ये MPSC फाउंडेशन बॅच चा अभ्यासक्रम पूर्ण करून दिला जाईल.म्हणजे यातून सरळ सेवा ,पोलीस भरती, MPSC कम्बाईन ग्रुप B व C व एमपीएससीच्या राज्यसेवा सारख्या परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतल्या जाईल. या परीक्षेसाठी नोंदणी करायची असल्यास खाली लिंक वर जाऊन ॲप्स डाऊनलोड करून घ्यावे. व तिथेच नोंदणी शुल्क भरून रजिस्ट्रेशन करावे.